जिम्नॅस्ट दीपा आशियाई, विश्व स्पर्धेला मुकणार

    दिनांक :24-May-2019
- दीपाचे लवकरच पुनरागमन : नंदी
नवी दिल्ली, 
 
भारतीय जिम्नॅस्टिक्ससाठी वाईट बातमी. अलिकडेच गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकर पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी आहे, मात्र तिला तंदुरुस्त होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत जिम्नॅस्टिक्स उपक्रमात सहभागी होता येणार नाही. परिणामी तिच्या आगामी आशियाई आणि विश्व जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सहभागी होण्याच्या आशा-आकांक्षा संपुष्टात आल्या आहेत.
 

 
 
 
 
13 ते 16 जूनदरम्यान मोंगोलिया येथे आशियाई स्पर्धेत सहभागी होण्याचे दीपाचे स्वप्न भंग पावले आहे. शिवाय तिच्या विश्वस्पर्धेतील सहभागाविषयी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जर्मनी 4 ते 13 ऑक्टोबरदरम्यान होणारी ही विश्व स्पर्धा टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धा राहणार आहे. या स्पर्धेतून दीपा ऑलिम्पिक पात्रता सिद्ध करण्याची आशा होती, परंतु आता या आशा धूसर झाल्या आहेत.