संग्राम जगताप लागले विधानसभेच्या तयारीला

    दिनांक :24-May-2019
अहमदनगर : नगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या विरोधात उभे असलेले संग्राम जगताप यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निकालावर संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पराभावाने आपण खचलो नसून पक्षांतरांचाही विचार नाही.  इतकेच नव्हे तर कालपासूनच आपण विधानसभेची तयारी सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले. मतमोजणी केंद्राकडे गुरूवारी न फिरकलेल्या जगताप यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. 'राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर अवघ्या २२ दिवसांत आम्ही प्रचार केला. त्या तुलनेत मला मिळालेली मते महत्वाची आहेत. त्याबद्दल मतदार आणि दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांचे आभार. आता आम्ही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. असे त्यांनी स्पष्ट केले.