हातच्या जागा गमावल्या, नव्या जागा जिंकल्या!

    दिनांक :24-May-2019
 मुंबई : या निवडणुकीत राजकीय पक्षांनी काही विद्यमान जागा गमावल्या आणि नव्या जागी विजय प्राप्त केला. यामध्ये शिवसेनेच्या चार खासदारांना पराभव स्वीकारावा लागला आहे, तर चार नवीन जागांवर विजय मिळवला आहे. राकॉंचाही विद्यमान दोन जागांवर पराभव झाला आहे, मात्र तीन नवीन जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत.
शिवसेनेच्या हातून शिरूर (शिवाजीराव आढळराव पाटील), रायगड (अनंत गीते), औरंगाबाद (चंद्रकांत खैरे), अमरावती (आनंदराव अडसूळ) या चार जागा गेल्यात.

 
 
शिवसेनेने नव्याने जिंकलेल्या जागांमध्ये हिंगोली  (हेमंत पाटील), पालघर (राजेंद्र गावित),
हातकणंगले (धैर्यशील माने), कोल्हापूर (संजय मंडलिक) यांचा समावेश आहे.
कोल्हापूर आणि माढा येथे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार होते. मात्र, या दोन्ही जागा राष्ट्रवादीने गमावल्या आहेत. कोल्हापुरात धनंजय महाडिक आणि माढ्यात संजय शिंदे पराभूत झाले आहेत, तर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे रायगडमधून, डॉ. अमोल कोल्हे शिरुरमधून आणि अमरावतीतून राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार नवनीत कौर राणा विजयी झाल्या आहेत.
2014च्या निवडणुकीत जिंकलेल्या नांदेड आणि हिंगोली या दोन्ही जागांवर कॉंग्रेसचा पराभव झाला आहे, तर निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले चंद्रपुरातील उमेदवार बाळू धानोरकर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभव केला.