कालचा निकाल म्हणजे हेराफेरी - नारायण राणे

    दिनांक :24-May-2019
रत्नागिरी: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचा ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा सलग दुसऱ्यांदा झालेला पराभव नारायण राणेंच्या पचनी पडलेला दिसत नाही. पराभवाचा हा धक्का त्यांच्यासाठी फार मोठा असून आता राणेंच्या राजकीय कारकिर्दीचा दिवा किती काळ तेवत राहणार यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. निकालानंतर राणेंनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या निकालावरचं प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. तळकोकणात आम्ही हरलो असलो तरीही पराभव मान्य नसल्यांचे मत  नारायण राणे यांनी व्यक्त केले. तसेच कोकणात सेनेचा उमेदवार निवडुन येण संशयास्पद असल्याचंही राणे म्हणाले. 
 
 
कालचा निकाल म्हणजे हेराफेरी असून निकालावर संशयाला जागा निर्माण होत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्व फेऱ्यांमध्ये ७००० ते ८००० मतांचा फरक कसा दाखवतो असा सवालही उपस्थित केला. तसेच कणकवलीत आमच्या उमेदवाराच्याच मतदारसंघात आम्हाला लीड नाही हेचं संशयास्पद असल्याचं राणे म्हणाले. या निकालावर निवडणूक आयोगाकडे तक्रार विचार करायचा की नाही यावर विचार करुन निर्णय घेणार असल्याचे राणेंनी सांगितले.