विश्वचषकामध्ये निक देणार 'या' टीमला पाठिंबा

    दिनांक :24-May-2019
‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त निक जोनास आणि प्रियंका चोप्राने त्यांच्या खास दिसण्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. निकच्या एका चाहत्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये निक आणि त्याच्या भावांनी चाहत्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली आहेत.
 
 

 
आय.पी.एल नंतर सध्या क्रिकेटविश्वात विश्वचषकाची चर्चा आहे. एका चाहत्याने निकला विचारले की, “प्रियांकाने त्याला क्रिकेटची ओळख करून दिली का? आणि यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये निक कोणत्या टीमला पाठिंबा देणार आहे?” या प्रश्नांचे उत्तर देताना निक म्हणाला की,”प्रियांकानेच मला क्रिकेटची ओळख करून दिली.तिच्या काकांमुळे मी क्रिकेटशी जास्त जोडला गेलो. मला वर्ल्ड कपमधील टीम्सबद्दल फारशी माहिती नसल्याने मी नक्की कोणत्या टीमला पूर्णपणे पाठिंबा देईन हे मला माहित नाही पण,मी भारताच्या संघाला नक्कीच चिअर करणार आहे.” निकने असेही सांगितले की, “आम्ही लग्नाच्या वेळेस क्रिकेट खेळलो होतो.”
 
 
 
 
 
याच व्हिडिओमध्ये निकला चाहत्यांनी असेही विचारले की,”त्याचा आवडता म्युझिक व्हिडिओ कोणता?”यावर निकने ‘सकर’चे नाव घेतले. निकच्या भावाने केलेल्या या व्हिडीओमध्ये प्रियांकाने सुद्धा काम केले आहे. निकच्या चाहत्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये निकसोबत त्याचे दोन भाऊसुद्धा आहेत. “सकरचे पॅलेसमध्ये शुटिंग करताना आम्हाला खूप मजा आली.” असंही निक म्हणाला.