‘कृष्णकुंजवरुन राज ठाकरे आघाडीवर’; नेटिझन्स घेत आहेत तोंडसुख

    दिनांक :24-May-2019
मुंबई : राज यांनी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान १२ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान राज्यभरामध्ये एकूण १० सभा घेतल्या. 
या सभेत राज यांनी भाजपच्या तथाकथित भोंगळ कारभाराचा 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत अनेक वेगवेगळ्या क्लिप्स त्यांनी दाखविल्या. राज यांच्या सभांचा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नक्कीच फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या चार तासांमध्ये हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या सर्वच जागांवर शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदावरांना आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. राज यांनी सभा घेतलेल्या बहुतेक सर्वच जागांवर महाआघाडीचे उमेदवार पिछाडीवर आहेत. यामुळे त्यांच्या या अनोख्या प्रचार अथवा अप्रचार शैलीने अनेकांचे मनोरंजन झाले. आलेल्या निकालावरून राज ठाकरेंना कुणी गांभीर्याने घेतले नसल्याचे स्पष्ट झाले असून आता नेटिझन्स त्यांना त्यांच्याच शैलीत ट्रोल करीत आहेत. कुणी ‘कृष्णकुंजवरुन राज ठाकरे आघाडीवर’;  असे म्हणत आहे तर कुणी 'बंद कर रे तो व्हिडीओ' असे ट्विट करीत आहे.