महिलांकडून देहविक्री करून घेणारे गजाआड

    दिनांक :24-May-2019
मालेगाव : मालेगाव तालूक्यातील ग्राम डोंगरकीन्ही येथील प्रज्वल हॉटेलवर महिलांचा देह विक्रीचा व्ययसाय चालतो अशी गुप्त बमाहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून काल २३ मेला मेहकर रोडवरील मालेगाव तालूक्यातील ग्राम डोंगरकीन्हीं येथिल प्रज्वल फॅमिली लॉज हॉटेल वर वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ.पवन बनसोड यांचे मार्गदर्शनात या हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता देहविक्रीची बातमी खरी ठरली. या हॉटेलवर महिला दक्षता समिती सदस्य प्रिया पाठक, व आशा रमेश पाठक व महिला पोलीस अधिकारी यांचे उपस्थितीत पोलीसांनी २३ में रोजी छापा मारला. हॉटेलचा मालक प्रदीप उचित गवई  यवतमाळ येथील दोन ३० वर्षीय महिलांकडून देह विक्रीयचा व्ययसाय करविताना रंगे हात पकडल्या गेला.  त्यावरून हॉटेल मालक प्रदीप उचित गवई यांचेवर महिलांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा कलम (PITA Act) 3,4,5 अन्वये कार्यवाही करण्यात आली.