ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंग कायम राहण्याची शक्यता

    दिनांक :25-May-2019
पॅरिस,
 
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाची मान्यता रद्द केली जाण्याची शक्यता असताना आगामी 2020 सालच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंग खेळ कायम राहण्याची शक्यता आहे.
 
 
 
 
 
 
 
 
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पुढील महिन्यात होणार्‍या बैठकीत महासंघाच्या निलंबनाबाबत चर्चा केली जाऊ शकते व निर्णयावर शिक्कामोर्तबही होऊ शकते. हा निर्णय घेण्यात आला तर खेळाडूंचा एकूण कोटा आणि स्पर्धांची संख्या अनुक्रमे 286 व 13 अशी निश्चित केली जाऊ शकते. आयओसीने हेही स्पष्ट केले आहे की, बॉक्सिंग महासंघाच्या पूर्ण मान्यतेबाबत टोकिओ ऑलिम्पिकनंतर आढावा घेतला जाईल.