ऐश्वर्या राय बच्चनने अखेर साईन केला मणिरत्नम यांचा सिनेमा

    दिनांक :25-May-2019
ऐश्वर्या राय बच्चनने मणिरत्नम यांचा सिनेमा साईन केल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगतेय. पण आता या चर्चेवर शिक्कामोर्तब झालेय. होय, खुद्द ऐश्वर्याने ही बातमी कन्फर्म केलीय. कान्स २०१९ दरम्यान अनुपमा चोप्राला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने या चित्रपटाबद्दलचा खुलासा केला.
 
 
 
मणिरत्नम यांनी अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण मी हा चित्रपट साईन केला आहे. मी मणिरत्नम यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करणार, हे मी आता सांगू शकते. त्यांच्यासोबत काम करण्यास मी कायम उत्सुक असते. कारण ते माझे गुरु आहेत, असे ऐश्वर्या यावेळी म्हणाली. अर्थात यापेक्षा अधिक तपशील देण्यास तिने नकार दिला.
अद्याप या चित्रपटाचे शीर्षक ठरलेले नाही. पण सूत्रांचे मानाल तर दहाव्या शतकातील राजा चोल याच्यावर आधारित हा सिनेमा आहे. चोल साम्राज्याचा पाडाव करण्यासाठी आपल्या पतीला भडकवणाºया एका अतिमहत्त्वाकांक्षी, कपटी स्त्रीची भूमिका ऐश्वर्या यात साकारताना दिसणार आहे. अर्थातच तिची ही भूमिका निगेटीव्ह भूमिका आहे. ऐश्वर्याच्या पतीची भूमिका साऊथ सुपरस्टार मोहनबाबू साकारणार अशी मध्यंतरी चर्चा होती. यानंतर ही भूमिका ‘बाहुबली’ सीरिजमध्ये कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज यांच्या झोळीत पडल्याची बातमी आली होती.