जगनमोहन रेड्डी यांचा सत्तेचा दावा

    दिनांक :25-May-2019
 हैदराबाद: वायएसआर कॉंग्रेसचे अध्यक्ष वाय. एस. जनगमोहन रेड्डी यांनी आज शनिवारी आंध्रप्रदेश आणि तेलंगणाचे राज्यपाल ईएसएल नरिंसहन्‌ यांची भेट घेऊन आंध्रप्रदेशात सत्तास्थापनेचा दावा सादर केला आहे.
विजयवाडा येथून हैदराबाद येथे पोहोचल्यावर त्यांनी दुपारी 4.30 वाजता राज्यपालांची भेट घेतली, अशी माहिती सूत्राने दिली. तत्पूर्वी, पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत वायएसआर कॉंग्रेस पार्टीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी जगनमोहन रेड्डी यांची एकमताने निवड करण्यात आली.
वायएसआर कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात नव्यानेच निवड झालेल्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. दर्जेदार कामगिरी करता यावी, यासाठी 2024 मध्ये आम्हाला यापेक्षा जास्त मोठा जनादेश देण्यात यावा, असे त्यांनी या बैठकीनंतर आमदारांचे आभार व्यक्त करताना सांगितले.
कार्यक्षम मुख्यमंत्री अशी ओळख निर्माण करण्यासाठी नव्याने निवडून आलेल्या आमदारांनी मदत आणि सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी बैठकीत केल्याची माहिती या पक्षाच्या आमदाराने दिली.