मुंबईमधून तीन कोटींचे कोकेन जप्त

    दिनांक :25-May-2019
 
मुंबई : खार, जुहू आणि वर्सोवा परिसरातील कोकेन पुरविणाऱ्या परदेशी युवकाला अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने काल अटक केली आहे. आरोपी हा केनियाच्या नागरिक असून डेव्हिड लेमरॉन ओल तुबुलाई (३३) असे त्याचे नाव आहे. पोलीस खार परिसरात पेट्रोलिंग करत असताना संशयित व्यक्ती हातात हिरवी बॅग घेऊन वावरत असल्याचे आढळुन आला. त्यानंतर त्याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्या अंगझडतीत ५१० ग्राम कोकेन पोलिसांना सापडला. या अमली पदार्थाची बाजारात ३ कोटी ६ लाख इतकी किंमत आहे. हा खार, जुहू आणि वर्सोवा परिसरात कोकेन पुरविणारा मुख्य सप्लायर असून सद्य पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.