नवऱ्यासाठी प्रियांकाने सोडलाय ‘भारत’

    दिनांक :25-May-2019
सध्या सलमान खान आणि कतरिना आगामी ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशमध्ये खूपच व्यस्त आहेत.‘देश लोगों से बनता है और पहचान उनके परिवार से’,अशा दमदार संवादाने सजलेला ‘भारत’च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद आहे. ५ जून २०१९रोजी म्हणजेच ईदच्या दिवशी ‘भारत’ प्रदर्शित होणार आहे.सलमान -कतरिनाचे चाहते या चित्रपटाची आवर्जून वाट बघत आहेत.
 
 
‘भारत’चा विषय निघाला की ओघाने प्रियांका चोप्राचं नाव येतंच.चित्रपट प्रदर्शनाची तारीख अगदीच जवळ आल्यामुळे सध्या सलमान ‘भारत’च दमदार प्रमोशन करत आहे. प्रमोशन करताना त्याने प्रियांकावर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडली नाही.एकीकडे प्रियांकावर टीका करत असला तरीही तिने चित्रपटाचं प्रमोशन करावं ही सलमानची सुप्त इच्छा आहे.
बॉलिवूड हंगामाला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान म्हणाला की,”प्रियांकाला आधीपासूनच ‘भारत’ची कथा आवडली होती. तिने चांगल्या कामासाठी नेहमीच खूप प्रयत्न केले आहेत.’भारत’च्या निमित्ताने तिला खूप चांगली संधी मिळाली होती.मात्र तिने नवऱ्यासाठी हा चित्रपट सोडला. यासाठी तिचं खरंच खूप कौतुक आहे.असे असले तरीही,चित्रपटाचे कथानक तिला खूप आवडल्याने तिने प्रमोशनचा भाग व्हायला काहीच हरकत नाही.”
गेली काही वर्ष ‘क्वांटिको’सारख्या सीरिजमध्ये काम करत असल्यामुळे प्रियांका बॉलिवूडपासून लांब होती.’भारत’च्या निमित्ताने ती बॉलिवूडमध्ये पुनरागम करणार होती. ‘भारत’मध्ये प्रियांकाने काम केले असते तर प्रियांका-सलमान ही जोडी दहा वर्षांनी प्रेक्षकांना बघता आली असती.लग्नासाठी प्रियांकाने चित्रपट नाकारल्यानंतर ‘भारत’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ट्विट करून तिला शुभेच्छा देखील दिल्या होत्या.