रियल माद्रिदचा माजी फॉरवर्ड बाप्तिस्ता निवृत्त

    दिनांक :25-May-2019
रिओ दी जानेरिओ,
 
स्पेनच्या दिग्गज रियल माद्रिद संघाचा माजी फॉवरर्ड ज्युलियो बाप्तिस्ता याने फुटबॉलमधील आपली निवृत्ती जाहीर केली आहे. ब्राझीलचा बाप्तिस्ता आपल्या फुटबॉलच्या कारकीर्दीत सुमारे दोन दशकपर्यंत व्यावसायिक खेळ खेळला. 34 वर्षीय बाप्तिस्ता गेल्या वर्षी एक सामना खेळला नव्हता. समाज माध्यमाद्वारे त्याने चाहत्यांना आपल्या निवृत्तीची माहिती देताना त्याने म्हटले आहे की, आता आपण आपले नवीन जीवन सुरू करीत आहोत.
 
 
 
 
 
 
 
 
 
20 वर्षे फुटबॉल खेळल्यानंतर आता आपण थांबलो पाहिजे, असा विचार आल्यामुळेच आपण निवृत्तीचा निर्णय घेतला. एक खेळाडू म्हणूनच आपण आपली फुटबॉलची कारकीर्द थांबविण्याचे ठरविले आहे आणि त्यामुळे मी तशी घोषणा करीत आहे, असेही त्याने ट्विटरमधील आपल्या संदेशात म्हटले आहे. आपले स्वप्न साकारण्यासाठी ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचा मी आभारी आहे. सर्वांचे धन्यवाद, असेही त्याने म्हटले आहे. 2000 साली ब्राझीलच्या साव पावलो क्लबमधून एक मिडफिल्डर म्हणून आपल्या व्यावसायिक कारकीर्दीला सुरुवात केल्यानंतर त्याने रियल माद्रिद, सेव्हिला, आर्सेनल आणि एएस रोमा आदी अव्वल क्लबचे विविध स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले. त्याने 47 सामने खेळले. 2010 च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते.