विश्वचषकात कोहली जास्त धावा काढणार : मार्क

    दिनांक :25-May-2019
मेलबर्न,
 
येत्या 30 मे पासून इंग्लंडच्या यजमानपदाखाली सुरू होणार्‍या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट  संघाचा कर्णधार आणि आक्रमक फलंदाज विराट कोहली सर्वाधिक धावांची नोंद करणार, असे भाकीत ऑस्ट्रेलियाचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू  मार्क वॉ याने व्यक्त केले आहे.
 
 
 
 

 
 
 
 
 
त्याने आगामी विश्वचषक कि‘केट स्पर्धेतील आपल्या मतानुसार अव्वल तीन फलंदाजांनी निवड केली आहे. त्यात त्याने भारताचा विराट कोहली, इंग्लंडचा जोस बटलर आणि आपल्या देशाचा डेव्हिड वॉर्नर यांना स्थान दिले आहे. यात विराटच अव्वल राहणार, असा दावाही त्याने केला आहे.
 
बटलरला त्याने दुसरा क्रम दिला आहे. बटलरने गेल्या चार वर्षांत कि‘केटच्या सर्वच प्रकारात चांगली कामगिरी बजावली आहे. याच महिन्यांच्या सुरुवातीला त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 50 चेंडूंमध्ये शतक हाणले होते. त्याआधी त्याने फेब्रुवारीत  77 चेंडूंवर 150 धावांचा डाव खेळला होता.