भारतीय तिरंदाजांना एकमेव कांस्य

    दिनांक :26-May-2019
- विश्वचषक तिरंदाजी तिसरे चरण
अंतल्या,
तिसर्‍या चरणाच्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत रजत चौहान, अभिषेक वर्मा व अमन सैनी यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुषांच्या कम्पाऊंड संघाला एकमेव कांस्यपदक जिंकण्यात यश मिळाले.
 
 

 
 
 
 
 
कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत या भारतीय त्रिकुटांनी जबरदस्त प्रदर्शन करत अॅण्टोन बुलाइव्ह, अलेक्झांडर डाम्बाईव्ह व पाव्हेल क्रायलोव्ह यांचा समावेश असलेल्या रशियाच्या संघाला 235-230 अशा पाच गुणांच्या फरकाने पराभूत केले.
 
महिलांचा संघसुद्धा कांस्यपदकाच्या लढतीत होता, परंतु त्यांना ग्रेट ब्रिटनकडून दोन गुणांनी पराभवाचा सामना करावा लागला. ज्योती सुरेखा व्हेन्नम, मुस्कान किरार व स्वाती दुधवाल यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला लायला अॅनिसन, इला गिब्सन व लुसी मेसन यांचा समावेश असलेल्या ब्रिटन संघाकडून 226-228 असा पराभव स्वीकारावा लागला. रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात भारतीय तिरंदाज एकही पदक जिंकू शकले नाहीत.