आदर्श मंडळाचा आदर्श; सापडलेली बॅग पैशांसह केली परत

    दिनांक :26-May-2019

शेगाव: संत गजाननाच्या दर्शनासाठी आलेल्या एका बाहेरगांवच्या भक्ताची बॅग चोरीला गेली परंतू ती बॅग आदर्श मंडळाच्या कार्यकरत्या़ना सापडली त्यांनी अत्यंत निकराचे प्रयत्न करुन संबधीत मालका पर्यत ती पोहचवली २० मे रोजी मंदिर परीसरातील तारापुरे यांच्या मालकिच्या महालक्ष्मी व्हेरायटीच्या टिन शेडमधे सकाळी दुकान उघडतांना कर्मचाऱ्यांना एक प्रवासी बँग पडलेली आढळली त्यांनी दुकानचे मँनेजर व आदर्श मंडळाचे अध्यक्ष दिपक शर्मा यांना ती दिली त्यांनी त्या बँगची पहिल्या खणातील उघड्या असलेल्या चेन मधून तपासणी केली असता एका फोटो स्टुडिओची पावती व नंबर त्यांना मिळाला त्यांनी संबधीत मो नंबरवर संपर्क केला तो औरंगाबादचा होता. त्यांनी बॅगमालकाला ओळखतो म्हणून सांगितले, त्यांचा मो नंबर दिला व अत्यंत गरीब माणसाची ती बॅग असल्याचे सांगितले दिलेल्या नंबरवर संपर्क केला असता फोन स्विच ऑफ येत होता. त्यानंतर कार्यकरत्यांनी परत फोटो स्टुडिओ मालकाशी संपर्क साधला. त्यांनी संबधीत बॅग मालकाशी संपर्क करुन दिला त्यावेळी त्यांचे नांव हरीदास विक्रमसिंग जाधव असल्याचे कळाले. औरंगाबाद सिल्लोड तालुक्यातील धोत्रा या गावचे हे गृहस्थ भारत स्वाभिमानी या रामदेव बाबंच्या संघटनेचे योग प्रचारक आहेत. त्यांना बँग सापडल्याचे समजताच अत्यंत आनंद झाला. आज ते शेगांवला आले असता त्यांना बँग परत करण्यात आली त्यामधे साडेसात हजार रुपये रोख, आधार कार्ड ओळख पत्र व अन्य कागदपत्र कपडे सुरक्षीत होते. बँग परत करतांना भाजपाचे जेष्ठ नेते प्रदीप सांगळे माजी सरपंच अरविंदजी इंगळे अनंत सुरोसे गजानन गणेश आशुतोष घुलेशे अकरम हे उपस्थित होते जाधव यांनी या सर्वांचे आभार मानले व बॅग मिळणे अशक्य वाटत असतांना संत गजाननाने क्रुपा केली असे ते म्हणाले भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संतोषजी देशमुख यांनी या बद्दल आदर्श मंडळाच्या कार्यकत्यांचे अभिनंदन केले आहे.