'बिग बॉस' मराठीत दिसणार 'हे' दोन कलाकार

    दिनांक :26-May-2019
'बिग बॉस मराठी २' आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या पर्वात स्पर्धक कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. आज ही उत्सुकता संपेल. पण त्याआधी मराठी सिनेसृष्टीतील दोन नावं समोर आली आहेत. अभिनेता अभिजित केळकर आणि किशोरी शहाणे हे दोन स्पर्धक बिग बॉसच्या घरात असतील.
 
 

 
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात कोण स्पर्धक असतील याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉसच्या घरात कोण-कोण असेल, याबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेता मिलिंद शिंदे, अभिनेत्री रसिका सुनील, अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री मनवा नाईक, अभिनेत्री केतकी चितळे, अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, अभिनेत्री नेहा पेंडसे, नाट्यकर्मी दिगंबर नाईक, टिकटॉक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अमृता देशमुख अशा काही नावांची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. पण आता दोन नावं समोर आली आहेत. अभिनेत्री किशोरी शहाणे आणि अभिनेता अभिजित केळकर हे दोन स्पर्धक बिग बॉसच्या घरात असणार आहेत.