बिनॉईट पेयरला लियॉन विजेतेपद

    दिनांक :26-May-2019
लियॉन, 
 
 
फ्रान्सच्या बेनॉइट पायरेने या मोसमात दुसरे क्ले कोर्ट विजेतेपद पटकावले. लियोन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेनॉइटने कॅनडाच्या युवा खेळाडू फेलिक्स ऑगर-अलायसिमवर 6-4, 6-3 अशी मात केली.
 
 
 

 
 
 
 
 
30 वर्षीय बेनॉइटने उष्ण वातावरणाची तमा न बाळगता जबरदस्त फटकेबाजी केली. पहिल्या सेटमधील तिसर्‍या गेममध्ये त्याने फेलिक्सला काही चुका करण्यास भाग पाडले. दुसर्‍या सेटमध्ये बेनॉइटने काही चुका केल्या, परंतु त्यानंतर त्याने स्वतःला सावरत अप्रतिम फोरहॅण्डचे फटके मारत विजेतेपद आपल्या नावावर केले. बेनॉइटने यावर्षी मराकेच येथील स्पर्धेचेही विजेतेपद पटकावले. या विजेतेपदामुळे आत्मविश्वास बळावलेला बेनॉइट आता रोलॅण्ड गॅरोसवर खेळण्यासाठी कूच करणार आहे.