महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती गंभीर : शरद पवार

    दिनांक :26-May-2019
मुंबई: आजच्या घडीला महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती खूपच गंभीर असल्याचे वक्तव्य माजी केंद्रीय कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले. ते सातारा जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
शरद पवारांनी आज कोेरेगांव तालुक्यातील चिलीवाडी आणि नागेवाडी गावांना भेट दिली. हवामान खात्याने मान्सूनच्या उशिरा येण्याबाबत आपला अंदाज जाहीर केल्याने सामान्य नागरिकांसह शेतकर्‍यांनी पाण्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
 

 
 
यावेळी त्यांनी पाणी फाऊंडेशनचे कार्य आणि अभिनेता आमिर खानच्या पुढाकाराबाबत कौतुक केले. त्यांचे हे कार्य महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात जलसंक्रमणास प्रोत्साहन देत असून, गावकरी एका महत्त्वाच्या कामात पूर्णपणे गुंतलेले आहेत, असेही ते म्हणाले. राज्यात पाणीपुरवठा करणार्‍या पाणी टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात असून त्यात अधिक वाढ होण्याची गरज आहे. याशिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या दुकानात अन्नधान्याची कमतरता असल्याची तक्रार आपल्याकडे आली असल्याने सरकारदरबारी त्याबाबत तक्रार केली जाईल, असेही शरद पवारांनी यावेळी सांगितले.