पेरूला भूकंपाचा धक्का

    दिनांक :26-May-2019
अमेरिकी देश पेरुच्या उत्तर मध्य भागाला आज भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. अमेरिकी भुवैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजाता ८ रेश्टर स्केल तीव्रतेचा हा धक्का जाणवला. काही तज्ज्ञाच्या मते या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका वाढला आहे. गेल्या सात दिवसांत पेरूमध्ये हा तिसरा भूकंपाचा धक्का आहे.
 
 

 
 
 
भूकंपात नेमके कोणते नुकसान झाले याची चौकशी करण्यात येत असल्याचे समजतेय. २५ मे रोजी सायंकाळी सहा वाजून २६ मिनिटांनी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ४.७८ इतकी नोंदवली गेली होती. तर २१ मे राजी झालेल्या भूकंपाची तीव्रता ५.१ रेश्टर स्केल नोंदवली आहे. भूकंपात कोणतेही वित्त अथवा मनुष्यहानी झाली नसल्याचे अमेरिकी वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.