मेस्सीला सलग तिसर्‍यांदा युरोपचा गोल्डन शूज

    दिनांक :26-May-2019
बार्सिलोना,
 
 
लियोनेल मेस्सी सलग तिसर्‍यांदा युरोपचा गोल्डन शूज जिंकणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. मेस्सीने आपल्या नजिकचा प्रतिस्पर्धी पॅरिस सेंट जर्मनच्या कायलिन मबाप्पेला चार गोलने मागे टाकत हा बहुमान प्राप्त केला. युरोप लीग मोसमात मेस्सीने सर्वाधिक 36 गोल नोंदविले, तर मबाप्पेने 33 गोल नोंदविले.
 
 
 

 
 
 
 
 
मेस्सीने सहाव्यांदा विक्रमी गोलची नोंद केलेली आहे. लीग वन मोसमात अखेरच्या सामन्यात पीएसजीला रिम्स संघाकडून 1-3 गोलने पराभव पत्करावा लागला. मेस्सीच्या या गोलमुळे बार्सिलोनाने गत महिन्यात ला लीगा विजेतेपद पटकावले. मात्र चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत लिव्हरपूलकडून पराभूत झाल्याने तो नाराज आहे. या वैयक्तिक पुरस्काराचा विचार करत नाही. लिव्हरपूलविरुद्धच्या सामन्यात आमचे काय हाल झाले, त्याचे शल्य अजूनही मनात सलत आहे, असे लियोनेल मेस्सी म्हणाला. कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेत व्हॅलेन्सियाविरुद्ध होणार्‍या सामन्याच्या पूर्वसंध्येला तो पत्रकारांशी संवाद साधत होता.