३० मे रोजी नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधान पदाची शपथ

    दिनांक :26-May-2019
नवी दिल्ली:  २०१९ लोकसभेच्या निवडणुकीत बहुमताने मिळालेल्या यशानंतर ‘नरेंद्र मोदी’ येत्या ३० मेला शनिवारी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण करणार आहेत. संध्याकाळी ७च्या सुमारास राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनादेखील शपथ दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला ३५३ जागांवर विजय मिळाला तर, नुसत्या भाजपला ३०३ जागांवर विजय मिळाला आहे.