अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जागीच ठार

    दिनांक :26-May-2019
मंगरूळनाथ: मंगरूळनाथ शहरालगतच असलेल्या मौजे मंगळसा फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना काल २५मेच्या राञी ११ वाजताच्या दरम्यान घडली.
श्रीकृष्ण लक्ष्मण काळे (४०) रा.पिंप्री बू.यांच्या गाडीला मागूण धडक दिल्यामूळे ते जागीच ठार झाले. घटनास्थळी अज्ञात मोटार सायकल गाडी क्र.एम.एच.३७-एस ०८४३ आढळूण आली आहे. घटनेचा तपास पि.आय.पाटील यांच्या मार्गदर्शनात शिवदास चव्हाण हे करीत आहे.