प्रिया मराठे वळली रंगभूमीकडे

    दिनांक :26-May-2019
नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रिया मराठे हे नाव घराघरात पोहोचले आहे. प्रियाने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केले आहे. प्रिया मराठे पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रिया पुन्हा नाटकात काम करणार आहे. हे कोणतं नाटकं आहे, यात प्रिया कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
 

 
 
 
प्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीट फॅन्सच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती नेहमीट तिचे फोटो शेअर करत असते. प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.