हृतिकचा सुपर ३० ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

    दिनांक :26-May-2019
गेल्या काही दिवसापासून बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’ हा चित्रपट वादात सापडला आहे. त्यातच हृतिक आणि कंगनाचा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार होता. परंतु हृतिकने नमते घेत प्रदर्शनाची तारीख बदलण्यास सांगितली होती. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख अधिकृतपणे घोषीत करण्यात आली आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.
 
 
 
 
 
 
 
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे ‘सुपर ३०’ या चित्रपटाची तारिख सांगितली आहे. ‘सुपर ३० चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख ठरली. १२ जुलै २०१९’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. याआधी सुपर ३० चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु त्याच दिवशी कंगनाचा ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले होते. त्यामुळे हृतिकने चित्रपट निर्मात्यांना ‘सुपर ३०’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यास सांगितले होते. त्यासाठी हृतिकने ट्विटरवर एक पोस्ट लिहीली होती.