ऑस्कर ॲकॅडमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत सकारात्मक

    दिनांक :26-May-2019
- जॉन बेली यांची माहिती

 
तभा ऑनलाईन टीम 
मुंबई,
ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस ॲण्ड सायन्सेसची (ऑस्कर अवॉर्डस्‌) ख्याती जगभरात असून, ऑस्कर कॅडमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत सकारात्मक असल्याचे ऑस्कर ॲकॅडमीचे अध्यक्ष जॉन बेली यांनी येथे सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज झालेल्या पत्रपरिषदेत जॉन बेली, त्यांच्या पत्नी आणि ऑस्कर ॲकॅडमीच्या गर्व्हनर कॅरल लिटलटन्‌, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उज्ज्वल निरगुडकर उपस्थित होते.
 
आज भारतात सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती केली जाते. त्यामुळेच या बॉलिवूड नगरी असलेल्या भारतात पहिल्यांदा येताना आनंद होत आहे. ऑस्कर ॲकॅडमीचे सध्या लंडन आणि युरोप येथे कार्यालय आहे. मात्र, मुंबईत कार्यालय सुरू केल्यास याकडे आशियातील एक केंद्र म्हणून पाहता येईल. त्यामुळे भारतातून परतल्यानंतर आपल्या ऑस्कर ॲकॅडमीच्या बैठकीत मुंबईतील कार्यालयाबाबत आपण प्रस्ताव ठेवू, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
आज आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय चित्रपटांचे अस्तित्व अधिकाधिक दिसावे याबाबत आपणसुद्धा आग‘ही असल्याचे बेली यांनी सांगितले. वर्षभरात भारतात 1800 चित्रपटांची निर्मिती होते, ही सं‘या हॉलिवूडपेक्षा चार पट जास्त आहे. आज भारतीय चित्रपटांची कथा, मांडणी आणि चित्रपट तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेले तंत्रज्ञान, यामुळे आपण प्रभावित झालो आहोत. सध्या ॲकॅडमीच्या विविध विभागांत 928 सदस्य वेगवेगळ्या 56 देशांतील आहेत. येणार्‍या काळात ऑस्कर ॲकॅडमीवर भारतीय चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी सहभाग द्यावा, जेणेकरून भारतीय चित्रपट जगभर पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा बेली यांनी यावेळी व्यक्त केली.
 
पत्रपरिषदेपूर्वी जॉन बेली आणि कॅरॉल लिटलटन्‌ यांनी तावडे यांची सेवासदन येथे भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत तावडे यांनी ऑस्कर ॲकॅडमीमध्ये तयार करीत असलेल्या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा कांस्य पुतळा असावा, अशी मागणी केली, तसेच आज ऑस्कर अवॉर्डसमध्ये भारतीय चित्रपटसृष्टी अधिकाधिक जोडली जावी, अशी मागणी केली.
 
ऑस्करच्या स्थापनेपासून ऑस्करचे कोणतेही अध्यक्ष यापूर्वी कधीच भारतात आले नव्हते. ऑस्करच्या स्थापनेपासून भारतामध्ये येणारे जॉन बेली हे पहिलेच अध्यक्ष आहेत. ऑस्कर अध्यक्षांना निमंत्रित करून मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय गोष्टी त्यांच्यामार्फत जगभरातील सिनेसृष्टीत पोहचविण्याच्या दृष्टीने हा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे.