विजय शंकर दुखापतग्रस्त नाही

    दिनांक :26-May-2019
लंडन, 
 
स्कॅिंनग अहवाल प्राप्त झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला दिलासा मिळाला आहे. अष्टपैलू विजय शंकर याच्या उजव्या खांद्यात कुठल्याही प्रकारची दुखापत नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
शुक्रवारी सराव सत्रादरम्यान खलील अहमदचा चेंडू विजय शंकरच्या खांद्याला लागला होता. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. सावधगिरी म्हणून तत्काळ त्याच्या खांद्याचे स्कॅिंनग करण्यात आले. मात्र वैद्यकीय अहवालात त्याला कुठल्याही प्रकारची दुखापत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शंकरला तंदुरुस्त करण्यासाठी बीसीसीआयची वैद्यकीय चमू सहकार्य करत आहे, असे बीसीसीआयने ट्विटमधून सांगितले.