अर्शद वारसीने शेअर केली 'ही' फेक न्यूज!

    दिनांक :27-May-2019
बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी एक फेक बातमी शेअर करून चांगलाच फसला. होय, श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि वन डे क्रिकेटमधील आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्या याच्या निधनाची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. अर्शदने कोणतीही खातरजमा न करता ही बातमी शेअर केली आणि मग काय, चांगलाच ट्रोल झाला. अतिशय धक्कादायक आणि दु:खद बातमी..., असे सनथ जयसूर्याच्या निधनाची बातमी शेअर करताना अर्शदने लिहिले.
 
 
 

 
 
 
 
विशेष म्हणजे, अर्शदच्या अनेक चाहत्यांनीही त्याचे हे ट्वीट वाचून सनथ जयसूर्याला श्रद्धांजली देणे सुरु केले. पण त्याचवेळी काही लोकांनी सनथ जयसूर्याच्या निधनाची बातमी फेक असल्याचे अर्शदच्या लक्षात आणून दिले. काहींनी खात्री न करता अशा फेक न्यूज शेअर केल्याबद्दल संतापही व्यक्त केला.
‘भाई, ये खबर झूठ है’, असे एका युजरने लिहिले. तर अन्य दुसऱ्या युजरने ‘भाई मेरे, पहले फॅक्ट चेक कर लिया करो,’ अशा शब्दांत अर्शदला सुनावले. ‘सेलिब्रिटी खातरजमा न करता अशा खोट्या बातम्या शेअर करतात, हे चिंतीत करणारे आहे,’ असे अनेकांनी लिहिले.