बायर्न म्युनिचला जर्मन चषक

    दिनांक :27-May-2019
बर्लिन, 
 
 
बायर्न म्युनिचने देशांतर्गत फुटबॉल स्पर्धेत दुहेरी विजेतेपदाचा मान मिळविला. जर्मन चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बायर्न म्युनिचने आरबी लिपझिगवर सरळ 3-0 ने विजय नोंदवून विजेतेपद पटकावले.
 
 

 
 
 
 
बर्लिनच्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये रंगलेल्या या रोमांचक सामन्यात रॉबर्ट लेवांडोवस्कीने दोन गोल, तर किंग्सले कोमानने एक गोल नोंदवित बायर्न म्युनिचच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. रॉबर्टने हा विजय संघमित्र अर्जेन रॉबिन व फ्रॅंक रिबेरी यांना समर्पित केला आहे. रॉबिन व रिबेरी दोघांनीही बायर्नची टी-शर्ट परिधान करत आपला अखेरचा सामना खेळला. रिबेरी हा जर्मन चषकाच्या आठ अंतिम सामन्यात खेळणारा एकमेव खेळाडू आहे.