इंडोनेशियात पुन्हा एकदा ज्वालामुखी सक्रिय

    दिनांक :27-May-2019
जाकार्ता,
 
माऊंट अगुंग ज्वालामुखी सक्रिय झाल्यामुळे दक्षिण इंडोनेशियात राख पसरली असून बाली विमानतळावरील विमान वाहतूक थांबवण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ज्वालामुखी सक्रिय झाल्याचे राष्ट्रीय आपदा यंत्रणेने सांगितले. त्याने जवळपास साडेचार मिनिटे लाव्हारस आणि गरम खडक बाहेर टाकला.तो जवळपास तीन किलोमीटर दूरपर्यंत पसरला.
 
 
 
 
 
बालीच्या चार उड्डाणांचा मार्ग बदलण्यात आला आहे आणि ज्वालामुखीच्या राखेमुळे पाच विमाने रद्द केली गेली आहेत, असे विमान वाहतूक संचालनालयाने सांगितले.