धानोरकरांच्या मागणीमुळे महिलांमध्ये संताप

    दिनांक :27-May-2019
चंद्रपूर : नुकत्याच पार पडलेल्या लोकलसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदार संघातून काँग्रेसचे बाळू धानोरकर खासदार म्हणून निवडूण आले. संघात शेतकऱ्यांचे, व्यावसायिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असतांना खासदार बाळू धानोरकर यांनी मात्र निवडून आल्या आल्या चंद्रपूरसह वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात यावी, अशी मागणी आग्रहाची मागणी केली खासदारांच्या या मागणीवरून दारूबंदीसाठी लढा देणाऱ्या महिला कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य महिलांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. दारूबंदीची अंमलबजावणी व कायदे कडक करण्याची मागणी केली असती तर ती निश्चित महत्त्वपूर्ण बाब मानली केली असती. मात्र चक्क दारूबंदी हटविण्याची मागणी खासदाराने केल्याने मागचा हेतू काय ? असा सवाल नागरिक करीत आहे. दारूबंदीमुळे जिल्ह्याचे व्यावसायिकदृष्ट्या नुकसान झाले आहे. महसूल बुडाला आहे. म्हणून चंद्रपूरसह वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटविली पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार धानोरकर यांच्या विधानावर सर्वत्र टीकेचा सूर व्यक्त होत आहे. राज्यात दुष्काळ आहे. पाण्याचे भीषण संकट आहे आणि महसूल बुडाला या सबबीखाली चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या जिल्ह्यातील दारूबंदी उठवा असे म्हणणे कितपत संयुक्तिक आहे. ही मागणीच दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया श्रमिक एल्गारच्या नेत्या . पारोमिता ॲड. गोस्वामी यांनी केली आहे.