भारतीय महिला संघासाठी कोरियातील विजय मोलाचा

    दिनांक :27-May-2019
बंगळुरू,
 
आगामी एफआयएच वूमेन्स सीरिज फायनल्सच्या पूर्वतयारीसाठी भारतीय महिला हॉकी संघाने अलिकडेच दक्षिण कोरियात जिंकलेली महत्त्वपूर्ण आहे, मात्र अखेरच्या व अंतिम सामन्यात संघाने केलेल्या चुकांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, असे मत महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक जोएर्ड मारिने यांनी व्यक्त केले आहे. ही स्पर्धा 15 जूनपासून जपानच्या हिरोशिमा येथे होणार आहे.
 
 

 
 
 
 
दक्षिण कोरियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय महिला संघाने लागोपाठ दोन सामने जिंकले व तिसरा सामना गमावला.
 
आम्हाला हवी तशी या मालिकेची सांगता करता आली नाही, परंतु याक्षणी खेळाडूंना मिळालेला अनुभव महत्त्वाचा होता, असे ते म्हणाले. तीनपैकी दोन सामन्यात संघाने उत्कृष्ट आणि व्यूहरचनेसह प्रदर्शन केले. दोन विजय संघाचा आत्मविश्वास बळावणारा आहे. आम्हाला हा विजय विसरून तिसर्‍या व अखेरच्या सामन्यातील चुकांवर लक्ष द्यायला पाहिजे. कारण या सामन्यात व्यूहरचनेनुसार खेळ झाला नाही. त्यामुळे आता महत्त्वपूर्ण ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून या चुकांमध्ये सुधारणा करण्यावर भर द्यायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
 
आगामी 27 मेपासून बंगळुरूमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रावर 26 खेळाडूंच्या कोर ग्रुपचे  राष्ट्रीय शिबिर होणार आहे.