विधानसभा लढविण्याची नाना पटोले यांची इच्छा

    दिनांक :27-May-2019
निवृत्ती घेण्यास नकार  
 
नागपूर: नागपूर लोकसभा मतदार संघातून पराजित झालेले काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत लढण्यास तयार असल्याचे संकेत कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी दिले आहेत तसेच राज्यात कॉंग्रेसची जबाबदारी दिल्यास ती देखील स्वीकारण्यास तयार असल्याचे कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी सांगितले. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षाने आदेश दिले होते म्हणून लोकसभा नागपुरातून लढलो. पक्षाने आदेश दिले तर विधानसभा देखील लढण्यास तयार असल्याचे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले . 
तसेच राजकारणातून निवृत्तीचा कुठलाही विचार नसून विरोधक म्हणून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवू असेही नाना पटोले म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल आणि वाढदिवसानिमित्त नाना पटोले यांनी नितीन गडकरी यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.