दराची जंगल परिसरात पोलिस - नक्षल चकमक

    दिनांक :27-May-2019
 नक्षली साहित्य जप्त
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील दराची जंगल परिसरात सी - ६० जवान आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली असून नक्षली साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही चकमक तासभर चालली. 
आज शोधमोहीम दरम्यान पोलीस सी-60 व  नक्षलवाद्यांमध्ये दराची जंगल परिसरात चकमक उडाली. जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षली जंगलात पसार झाले. यात काही नक्षली जखमी झाल्याचा अंदाज आहे. यानंतर शोधमोहिमेदरम्यान काही नक्षली साहित्य आढळून आल्याची माहिती आहे.