शरद पवारांची भूमिका साकारायचीय : सुबोध भावे

    दिनांक :27-May-2019
आजवर अनेक दिग्गजांच्या भूमिका मी साकारल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका साकारायला नक्कीच आवडेल, असं मत अभिनेता सुबोध भावेने व्यक्त केले. सुबोधने  आतापर्यंत लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर यांचे बायोपिक केले.
 
 
 
‘मनात काय चाललंय हे तुम्हाला काहीच कळू द्यायचं नाही. हे फार अवघड आहे. शरद पवार ५५ वर्ष राजकारणात आहेत. त्यांनी जेवढे बघितलंय तेवढं आज राजकारणात कोणीच पाहिलेले नाही. मी चेष्टा म्हणून म्हणत नाही, पण सतत सातत्यानं व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल,’ असं सुबोध म्हणाला.
याआधी सुबोधनं जेव्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीची मुलाखत घेतली होती तेव्हा तो राहुलचा बायोपिक करणार याची चर्चा झाली होती. सुबोध स्वत: शिवसेनेच्या चित्रपट सेनेचा पदाधिकारी आहे.