'त्यांचा पराभव होणार हे मला आधीच माहीत होतं'

    दिनांक :27-May-2019
यंदाची निवडणूक अनेक कारणांसाठी खास ठरली. लोकसभा निवडणुकीतील काही जागांवर सर्वांचंच विशेष लक्ष होतं. नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि वादग्रस्त ट्विटसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री स्वरा भास्करने या निवडणुकीत कन्हैय्या कुमार, आतिशी मर्लेना, दिग्वीजय सिंह आणि दिलीप पांडे यांच्यासाठी प्रचार केला. विशेष म्हणजे या चारही उमेदवारांचा निवडणुकीत पराभव झाला. ‘मी ज्या उमेदवारांचा प्रचार केला, त्यांचा पराभव होणार हे मला आधीच माहीत होतं,’ असं ट्विट स्वराने केले आहे.
 
 

 
 
 
‘मी ज्या उमेदवारांचा प्रचार केला, त्यांचा पराभव होणार हे मला आधीच माहीत होतं. पण हे उमेदवार लोकशाही, संविधानाचा आदर करतात, देशातील तिरस्काराविरोधात लढा देतात म्हणून मी त्यांचा प्रचार केला. काहीही झालं तरी जे सत्य आहे, त्याचं मूल्य कधीही कमी होत नाही,’ असंही स्वराने ट्विटमध्ये म्हटलं आहे. स्वराच्या या ट्विटवरून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलंय.
पुढच्या वेळेस त्या उमेदवारांना विचारून घे की प्रचारासाठी त्यांना तू हवी की नाही, अशी खिल्ली एका युजरने उडवली. तर स्वरा हारण्यासाठी प्रचार करते, असं एकाने म्हटलं.