टोरोंटो रॅप्टर्स प्रथमच एनबीए अंतिम फेरीत

    दिनांक :27-May-2019
न्यू यॉर्क,
 
टोरोंटो रॅप्टर्सने अव्वल सीड मिलवाउकी बक्सवर 100-94 असा रोमांचक विजय नोंदवून प्रथमच प्रतिष्ठेच्या एनबीए बास्केटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविला. आता ईस्टर्न कॉन्फरन्स गटाचा विजेता दोनवेळचा विजेत्या गोल्डन स्टेट वॉरियर्सविरुद्ध निर्णायक सामन्यात खेळेल. कावी लियोनार्ड टोरोंटोच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने 27 गुणांचे योगदान दिले व कारकीर्दीत सर्वाधिक 17 परतलेल्या चेंडूवर ताबा मिळविला. टोरोंटो रॅप्टर्सने सहा सामन्यांची मालिका जिंकत अंतिम फेरीत आपले स्थान सुनिश्चित केले.
 
 
 
 
 
 
स्कॉटियाबँक एरिनामध्ये रंगलेल्या सामन्यात मिलवाउकीने दमदार सुरुवात केली, परंतु चौथ्या चरणात टोरोंटोने जोरदार मुसंडी मारली आणि सामन्यात चुरस निर्माण केली. 24 वर्षांच्या इतिहासात टोरोंटो रॅप्टर्सने प्रथमच एनबीए बास्केटबॉलची अंतिम फेरी गाठली. आता गुरुवारी टोरोंटो येथे सर्वोत्तम सात अंतिम सामन्यातील पहिला सामना टोरोंटो रॅप्टर्स आणि गोल्डन स्टेट वॉरियर्स यांच्यात खेळला जाणार आहे.