ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत बारा नेते

    दिनांक :27-May-2019
लंडन,
 
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे सात जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट, माजी परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन, आरोग्य मंत्री मॅट हॅनॉक, रोरी स्टुअर्ट आणि एस्टर मॅके यांच्यासह बारा नेत्यांची नावे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत.
 
 

 
 
 
ब्रेक्झिटच्या मुद्द्यावर संसदेतील सर्व खासदारांची संमती मिळवण्यासाठी नव्या पंतप्रधानांना कसोशीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. थेरेसा मे यांच्या राजीनाम्यासह सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करावी अशी मागणी लेबर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांच्यासह अन्य काही नेत्यांनी केली आहे.