आशिया बॅडमिंटन काऊन्सिल उपाध्यक्षपदी हिमांता बिस्वा शर्मा

    दिनांक :27-May-2019
नवी दिल्ली,
 
 
भारतीय बॅडिंमटन संघटनेचे (बीएआय) अध्यक्ष हिमांता बिस्वा शर्मा यांची आशिया बॅडमिंटन काऊन्सिलच्या (बीएसी) उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. 50 वर्षीय बिस्वा सर्मा यांना एकूण 40 पैकी 35 मते मिळालीत. हिमांता बिस्वा शर्मा आता आशिया खंडाच्या समितीवर गेले आहे. भारतात बॅडमिंटनचा विकास करण्यासाठी आशिया बॅडमिंटन काऊन्सिलकडून निश्चितच मदत मिळेल, असा विश्वास बीएआयचे महासचिव अजय सिंघानिया यांनी व्यक्त केला.
 
 
 
 
 
आसामचे आरोग्य व शिक्षण मंत्री हिमांता हे गतवर्षी गोवा येथे बीएआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बीएआयचे अध्यक्ष म्हणून अविरोध निवडून आले होते. बीएसीचे अध्यक्ष अॅण्टोन सुबोवो यांनी बीएआयचे सचिव (स्पर्धा) ओमर रशिद यांची सुद्धा बीएसीच्या विकास समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. सुधीर वेमुरीसुद्धा बीएसीच्या तांत्रिक समितीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील.