विहिंपचे केंद्रीय मंत्री व्यंकटेश आबदेव कालवश

    दिनांक :28-May-2019
ब्रम्हपुरी: मूळचे ब्रम्हपुरीचे  रा. स्व. संघाचे निष्ठावान स्वयंसेवक तथा वििंहपचे केंद्रीय मंत्री प्रा. व्यंकटेश नारायण उपाख्य  बाळासाहेब आबदेव यांचे सुमारे साडेतीन वर्षांच्या प्रदीर्घ आजारानंतर पुण्यात 27 मे रोजी रात्री 9.30 वाजता निधन झाले. मृत्युसमयी ते 67 वर्षांचे होते.

 
 
21 नोव्हेंबर 2016 ला स्व. अशोक सिंघल यांच्या निधनानंतर दिल्लीतील श्रद्धांजली सभेसाठी निघताना वििंहपच्या दिल्लीतील केंद्रीय कार्यालयातच ते भोवळ येऊन पडले होते. तेव्हापासून दिल्ली व पुण्यात त्यांच्यावर सतत उपचार करण्यात येत होते. पुण्यात त्यांचे मुलाकडे वास्तव्य होते.
एम. कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यांनी मुरूड जंजीरा येथे प्राध्यापक म्हणून सेवा दिली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी वििंहपचे पूर्णकालीन कार्य सुरू केले. अल्पावधीतच त्यांची वििंहपच्या केंद्रीय मंत्रिपदी नियुक्ती झाली. त्यानिमित्त सततचा देशभरातील प्रवास व व्यस्त कार्यक्रमातून स्व. अशोक सिंघल यांच्या निधनानंतर त्यांची प्रकृती उपचाराला प्रतिसाद देत नव्हती. त्यांच्या शैक्षणिक काळात ब्रम्हपुरीत  व चंद्रपूर येथे विद्यार्थी परिषदेच्या कार्यात ते अनेक वर्षे कार्यरत होते. परखड व निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, पाच बहिणी व बराच मोठा आप्त-मित्र परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार, 28 मे रोजी पुणे येथील वैकुंठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडला.