मुलाच्या हातात चायना मोबाईलचा स्फोट

    दिनांक :28-May-2019
मुलगा गंभीर जखमी
धारणी: तालुक्यातील धोदरा गावातील राजेंद्र कास्देकर (12) हा चायना मेड मोबाईलला चार्ज करतेवेळी गेम खेळत असताना बॅटरीचा स्फोट झाल्याने गंभीर जखमी झाला. धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर राजेंद्रला अमरावती रेफर करण्यात आले.
 
 
 
मंगळवार 28 मे रोजी दुपारी आपल्या घरातच राजेंद्र संजुलाल कास्देकर हा चायना मेड मोबाईलला चार्जिंगवर लावून गेम खेळत होता. अचानक हातातच मोबाईल असताना विस्फोट होऊन तो जबर जखमी झाला. थोडक्याने राजेंद्रचे डोळे वाचले. उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर जखमी राजेंद्रला अमरावती रेफर करण्यात आले. सध्या मेळघाटात जिओ सुरु झाल्यापासून गावागावात मोबाईल पोचलेले आहेत. प्रामुख्याने आदिवासी बालकांना मोबाईलवर गेम खेळणे खूप आवडत असते. युवकांना व्हिडीओ गेम आणि जंगलात व शेतात राहणार्‍यांना फिल्मी गाणी ऐकण्याचा छंद लागलेला आहे.