'बिग बॉस'च्या घरात पार पडणार पहिला नॉमिनेशन टास्क

    दिनांक :28-May-2019
'बिग बॉस'च्या घरात पहिल्याच दिवशी सदस्यांना मोठा धक्का बसलाय. घरात एक दिवसही पूर्ण झालेला नसताना त्यांना ४ सदस्यांना नॉमिनेट करायला सांगण्यात आले. शिवाय, आता घरात पहिला वहिला नॉमिनेशन टास्कही रंगणार आहे.
 
 
'बिग बॉस' घरातील सदस्यांना एकत्र बोलावून सहमताने चार अपात्र सदस्यांची नावे ठरवायला सांगितली. घरातील इतर सदस्यांनी अभिजित बिचुकले, मैथिली जावकर, वैशाली म्हाडे आणि शिव ठाकरे यांना घरासाठी अपात्र ठरवले. बिग बॉसनं दिलेल्या छोट्याश्या अॅक्टिव्हिटीमुळे या चौघांपैकी मैथिली सुरक्षित झाली तर शिव थेट नॉमिनेट झाला. परंतु, वैशाली म्हाडे आणि अभिजीत बिचुकले यांच्यावर मात्र नॉमिनेशनची टांगती तलवार आहे.
घरात टिकून राहण्यासाठी आता वैशाली म्हाडे आणि अभिजीत बिचुकले यांना एक टास्क पूर्ण करावा लागणार आहे. त्या दोघांना घरातील सदस्यांच्या मदतीनं वेगवेगळ्या टीम बनवून हा टास्क पूर्ण करावा लागणार आहे. दोघांपैकी जो सदस्य टास्क जिंकेल तो सुरक्षित राहणार आहे. परंतु, या स्पर्धकांना बिग बॉस नेमका कोणता टास्क देणार, या टास्कमुळे कोण कोणाला साथ देणार आणि कोण कोणाच्या टीममध्ये जाणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.