राजू शेट्टींनी घेतली राज ठाकरेंची भेट

    दिनांक :28-May-2019
 
 
 
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ‘कृष्णकुंज’ या राज यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली.  राजु शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेट घेतली मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या भेटीनंतर राजकीय चर्चेला पुन्हा एकदा उधान आले आहे. यांच्यात केवळ २० मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीचा गंध या भेटीला येत असल्याचे बोलले जात आहे .