रविना टंडन वठवणार इंदिरा गांधींची भूमिका

    दिनांक :28-May-2019
'केजीएफ' या सुपरहिट कन्नड सिनेमाच्या सिक्वेलमध्ये अभिनेत्री रविना टंडन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे 'मातृ' नंतर बऱ्याच दिवसांनी रविना टंडन कन्नड सिनेमात दिसणार आहे.
 
 
बंगळुरूजवळील कोलार येथे सोन्याच्या खाणी सापडतात. या खाणींमध्ये गुंतलेल्या अर्थकारणावर आणि राजकारणावर 'कोलार गोल्ड फिल्ड्स' हा सिनेमा आधारित आहे. या चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट झाल्यानंतर आता दुसऱ्या भागाचे चित्रीकरण सुरू झालं आहे. या भागात रविना टंडन माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारत असल्याची माहिती मिळते आहे. केजीएफ हा कन्नडसोबत इतरही भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग पहिल्या भागाहून अधिक भव्य दिव्य करण्याची तयारी निर्माते करत आहेत. कन्नड सुपरस्टार यश या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे.