'प्रसिद्धीच्या जाळ्यात अडकू नकोस', अनुपम खेर यांचा 'गंभीर' सल्ला

    दिनांक :29-May-2019
अभिनेते अनुपम खेर यांनी माजी क्रिकेटर आणि नवनिर्वाचित खासदार गौतम गंभीरला एक मोलाचा सल्ला दिला आहे. काही ठराविक प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्ध होण्याच्या जाळ्यात अडकू नकोस असं अनुपम खेर यांनी सांगितले आहे. गौतम गंभीर याने गुरुग्राम येथे एका मुस्लिम तरुणाला झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध करत टीका केली होती. याच मुद्द्यावरुन अनुपम खेर यांनी हा सल्ला दिला आहे.
 

 
 
  
अनुपम खेर यांनी ट्विटरवरुन गौतम गंभीरला त्याच्या विजयाच्या शुभेच्छा देत सल्लाही दिला आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘प्रिय गौतम गंभीर, विजयाच्या शुभेच्छा. एक भारतीय म्हणून याचा मला आनंद आहे. तू मला सल्ला विचारला नाही आहेस पण तरीही, काही ठराविक प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्ध होण्याच्या जाळ्यात अडकू नकोस. तुझे काम तुझ्यासाठी बोलेल. तुझी वक्तव्यं नाही’.