आणीबाणीच्या काळातील सत्याग्रहींना धनादेश वितरण

    दिनांक :29-May-2019
तभा ऑनलाईन टीम 
अकोला, 
आणीबाणीच्या काळात ज्या व्यक्तींना कारावास सोसावा लागला अशा व्यकतींचा सन्मान व यशोचित गौरव करण्यासाठी शासनाने दरमहा 10 हजार रूपये मानधन व त्यांच्या विधवा पत्नीस 5 हजार रूपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. त्या आणीबाणीच्या काळात ज्या व्यक्तींना कारावास सोसावा लागला अशांना आज बुधवारी खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते लोकशाही सभागृहात धनादेश वितरीत करण्यात आले.  
 
 
यावेळी बोलताना खासदार संजय धोत्रे म्हणाले की, आणीबाणीमुळे देशातील एका पिढीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची भर निघणे कठीण आहे. परंतू शासनाव्दारे या काळात लोकशाही करीता लढा देणा-या सत्याग्रहींचा सन्मान म्हणून व कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न म्हणून शासनाने सदर मानधन दिले आहे. आपल्या पिढीचे सतत मार्गदर्शन मिळावे असेही ते म्हणाले.
 
जिल्हयात आणीबाणीच्या काळात ज्या व्यक्तींना कारावास सोसावा लागला अशा व्यकतींची एकुण 85 अशी संख्या आहे. आज जानेवारी 2018 पासुन ते मार्च 2019 पर्यंतच्या मानधनाचे थकबाकीसह वितरण करण्यात आले.