'हा' खेळाडू एनबीए अंतिम फेरीला मुकणार

    दिनांक :29-May-2019
न्यू यॉर्क,
 
 
प्रतिष्ठेच्या एनबीए बास्केटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीला गोल्डन स्टेट वॉरियर्सचा आक्रमक खेळाडू केव्हिन दुरांत मुकणार आहे. कारण केव्हिनच्या पायाच्या पोटरीला दुखापत झाली आहे. गुरुवारी टोरांटो येथे गोल्डन स्टेट वॉरियर्स आणि टोरांटो रॅप्टर्स यांच्यात अंतिम फेरीचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात खेळण्यासाठी केव्हिन टोरांटोला येणार की नाही, हे अद्याप ठरले नाही, असे प्रशिक्षक स्टीव्ह केर यांनी सांगितले.
 
 
8 मे रोजी वेस्टर्न कॉन्फरन्स अंतिम फेरीत हॉस्टन रॉकेट्‌सविरुद्धच्या सामन्यादरम्यान केव्हिनच्या उजव्या पायाच्या पोटरीला दुखापत झाली होती. केव्हिन स्वतःच खेळण्याची तयारी करत आहे, परंतु त्याने पूर्ण जोमाने सराव केलेला नाही. त्याच्या तंदुरुस्तीविषयी ट्रेनर रिक सेलेब्रिनी यांच्याशी अद्याप बोललो नाही, असे ते म्हणाले. डीमार्कस कजिन्स हासुद्धा दुखापतग्रस्त  असून संघासमोर प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.