वन्य प्राण्यांपासून शेती संरक्षण

    दिनांक :29-May-2019
अलिकडच्या काळात बेसुमार जंगलतोडीमुळे जंगलांचं क्षेत्र कमी होत असल्यामुळे त्यात वास्तव्य करणार्‍या प्राण्यांवर सुरक्षित जागेचा शोध घेण्याची वेळ आली आहे. तो घेताना हे वन्यप्राणी अनेकवेळा मानवी वस्तीत आणि शेतात शिरतात. त्यामुळे मानवी जिविताला धोका निर्माण होतो, तसंच शेतांचंही प्रचंड नुकसान होतं. उदाहरण द्यायचं तर कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या हत्तींमुळे आपल्याकडील शेतीचं नुकसान झाल्याच्या अनेक घटना घडल्या. कोल्ह्यांनी तसंच रान डुकरांनी शेतीचं नुकसान केल्याचंही दिसतं.
 
 
 
रानडुकरांपासून शेताचं संरक्षण करण्यासाठी डब्यांचा, फटाक्यांचा किंवा बंदुकीचा आवाज करणं असे उपाय शेतकर्‍यांकडून योजले जातात. पारंपरिक किंवा आधुनिक पद्धतीने शेतीला कुंपण बांधणं, शेतीभोवती चर खोदणं असेही संरक्षणात्मक उपाय शेतकर्‍यांनी केले आहेत. तर हे उपाय खर्चिक वाटणार्‍यांनी वन्यप्राणी खाणार नाहीत अशी पिकं घेऊन शतीचं संरक्षण केलं आहे. शासनातर्फे शेती संरक्षणासाठी बंदूक परवाने दिले जातात. परंतु सर्वच शेतकर्‍यांना बंदुका विकत घेणं आणि त्यांचा उपयोग करणं परवडण्यासारखं नाही. तसंच विशिष्ट वन्यप्राण्यांना मारणेंगुन्हा असल्यानेे बंदुकीच्या वापरावर मर्यादा येतात.
 
दुष्काळामुळे नुकसान होणार्‍या पिकांचा विमा उतरवण्याची पद्धत आहे, त्याचप्रमाणे वन्यप्राण्यांपासून होणार्‍या पिकांच्या नुकसानीबाबत भरपाईची तरतूद आहे. त्यानुसार रानडुक्कर, हरीण, रानगवा आणि हत्ती या वन्यप्राण्यांपासून भरपाई दिली जाते. पोपट, वटवाघूळ या सारख्या पक्ष्यांकडूनही शेतीचं काही प्रमाणात नुकसान होतं. दिवसा शेतीचं नुकसान करणार्‍या पक्ष्यांपासून संरक्षणासाठी शेतकरी उपाययोजना करत असले तरी वटवाघुळासारख्या पक्ष्यांमुळे रात्री पिकांचं होणारं नुकसान कसं टाळायचं हा प्रश्न कायम त्रासदायक ठरतो.