नेमारच्या जागी 'हा' झाला कर्णधार

    दिनांक :29-May-2019
रिओ दी जानेरियो ,
 
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेसाठी ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाच्या नेतृत्वाची धुरा नेमारच्या जागी डॅनी अॅल्व्हिसकडे सोपविण्यात आली आहे, अशी घोषणा ब्राझील फुटबॉल महासंघाने केली आहे. प्रशिक्षक टिटे यांच्या मार्फत संघनेतृत्व बदलाचा निर्णय नेमारला कळविण्यात आल्याचे महासंघाने म्हटले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
अलिकडेच फ्रेंच कप अंतिम सामन्यात पॅरिस सेंट जर्मनचा रेन्नीज संघाकडून पराभव झाला. या सामन्यानंतर नेमारने एका प्रेक्षकावर हल्ला केला होता. त्यामुळे नेमारला तीन सामन्यासाठी निलंबित करण्यात आले होते. 14 जूनपासून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा प्रारंभ होणार असून आठवेळचा विजेता ब्राझील संघाला आपल्या गटात बोलिव्हिया, व्हेनेझुएला व पेरू संघाविरुद्ध सामने खेळावयाचे आहे. तत्पूर्वी, ब्राझीलचा संघ कतार व होंडारसविरुद्ध दोन मैत्रिपूर्ण सामने खेळणार आहे.