दोन गटांत विभागले गेले 'बिग बॉस'चे घर

    दिनांक :29-May-2019
'बिग बॉस'च्या घरात सदस्यांची एकमेकांशी झालेली मैत्री असो किंवा भांडणं त्यामुळे घरात आपल्याला नेहमीच गट पडलेले पाहायला मिळतात. 'बिग बॉस सीझन २' च्या दुसऱ्याच दिवशी घरात २ गट पडलेले पाहायला मिळत नाही. पण हे गट मैत्री किंवा भांडणांमुळे पडले नसून पहिल्या नॉमिनेशन टास्कमुळे पडले आहेत.
 
 
'बिग बॉस'ने पहिल्याच दिवशी चार नावडत्या सदस्यांना नॉमिनेट करण्याचा आदेश घरातील इतर सदस्यांना दिला. त्यानंतर नॉमिनेट झालेल्या शिव ठाकरे, मैथिली जावकर, वैशाली म्हाडे आणि अभिजीत बिचुकले या चौघांपैकी मैथिली सुरक्षित झाली तर शिव थेट नॉमिनेशन प्रक्रियेत पोहोचला. त्यामुळे वैशाली म्हाडे आणि अभिजीत बिचुकले यांच्यात आता नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. नॉमिनेशन टास्कसाठी या दोघांनाही आपल्या आवडीचे स्पर्धक निवडून टीम बनवण्यास सांगण्यात आले.
या दोन्ही टीम लीडरनी स्पर्धक निवडल्यानंतर घर दोन टीम्समध्ये विभागलं गेलं. अभिजीत केळकर, शिव ठाकरे, शिवानी सुर्वे, वीणा जगताप, पराग कान्हेरे आणि विद्याधर जोशी वैशाली म्हाडेच्या टीममध्ये तर माधव देवचक्के ,रूपाली भोसले, किशोरी शहाणे, नेहा शितोळे, दिगंबर नाईक, मैथिली जावकर आणि सुलोचन चव्हाण हे सदस्य अभिजीत बिचुकलेच्या टीममध्ये विभागले गेले. या दोन टीम्समुळे घरात गटा-तटाचं राजकारण सुरू होताना दिसू लागलं आहे. आपल्या लीडरला वाचवण्यासाठी आता हे सदस्य काय करतील हे येत्या काही भागांमध्ये स्पष्ट होताना दिसेल.